ITR: मोजकेच दिवस शिल्लक; घाई करा, पण 'या' चुका टाळा

प्राप्तिकर भरताना तुमच्याकडून कोणत्या चुका होऊ शकतात?

वर्ष टाकताना गडबड : योग्य मूल्यांकन वर्ष, आर्थिक वर्ष निवडा. जर उत्पन्न आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी असेल तर मूल्यांकन वर्ष २०२५-२६ निवडा.

फॉर्म गोंधळ : आयटीआर फॉर्म-१ ते फॉर्म-४ पर्यंत वेगवेगळे फॉर्म आहेत. उत्पन्नानुसार योग्य फॉर्म निवडा. 

चुकीचे पॅन-आधार : आयटीआरमध्ये पॅन, आधार क्रमांक आणि बँक तपशील योग्यरीत्या भरा.

सर्व उत्पन्न न दाखवणे : पगारच नाही, तर व्याज, भाडे, नफा, फ्री लान्सिंगमधून मिळणारे उत्पन्न देखील जोडा.

२६एएस-एआयएस एकत्र न करणे : आयटीआर दाखल करण्यापूर्वी हे फॉर्म एकत्र करा. सरकारकडे बँका, नोकरी व गुंतवणुकींबद्दलची माहिती आधीच आहे.

आता फॉर्म २६ म्हणजे काय तर हा फॉर्म आयकर विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध असतो. त्यात कापलेला टीडीएस, भरलेला आगाऊ कर, कर परतावा यासह सर्व आर्थिक माहिती असते.

आयटीआर दाखल करण्यापूर्वी २६ एएस पाहणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमच्या उत्पन्नातून कापलेला कर सरकारकडे योग्यरीत्या जमा झाला आहे की नाही याची खात्री करता येईल.

एआयएस म्हणजे एका व्यक्तीने वर्षभरात नेमके कोणते आर्थिक व्यवहार केले याची माहिती यातून मिळते. यावरून दिसून येते की, आपली किती आर्थिक माहिती सरकारकडे आधीच उपलब्ध आहे. 

ई-चालान भरले नाही
तर काय होते?

Click Here