पैशांची गरज पडली की, पर्सनल लोन हा सगळ्यात सोपा पर्याय ठरू लागला आहे. पण, छुप्या खर्चांमुळे तुम्हाला हे लोन महागात पडत. त्यामुळे जास्त इएमआय भरावा लागतो.
पर्सनल लोन घेताना सगळ्या अटी शर्थी व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे व्याजदर, परतफेडीचा कालावधी, कर्ज प्रक्रिया शुल्क आणि प्री पेमेंट शुल्क असे. हे समजून न घेतल्यामुळे नंतर जास्त पैसे द्यावे लागतात.
कर्ज घेताना फक्त व्याजदर किती इतकंच जास्त बघितलं जातं. पण, ०.५ ते ३ टक्के प्रोसेसिंग फीस, लेट पेमेंट फीस, स्टॅम्प ड्युटी, प्री पेटेंट चार्जेसमुळे इएमआय वाढवतात आणि कर्जही.
पर्सनल लोनचा व्याजदर प्रत्येक बँकेंचा वेगवेगळा आहे. १०.९० टक्क्यांपासून ते २४ टक्क्यांपर्यंत तो असू शकतो. त्यामुळे व्याजदर आणि इतर खर्चही वाढले तर तुमच्यावरील बोजा वाढेल.
अनेकजण एकाच वेळी अनेक पर्सनल लोन घेतात. त्यामुळे ईएमआयचं ओझं वाढतं. त्यामुळे इएमआय चुकण्याचा धोकाही असतो. त्याचा थेट परिणाम सीबिल स्कोरवर होतो.
ईएमआय कमी हवा म्हणून दीर्घ मुदतीचे लोन घेण्याकडे कल असतो. पण, त्यामुळे खूप जास्त व्याज भरावं लागतं. जास्त इएमआय, कमी कालावधीमुळे तुमचे पैसे वाचतात.
कर्ज घेतानाच तुम्ही त्याच्या परतफेडीचा व्यवस्थित नियोजन केले नाही, तर त्याचे ओझं वाढत जातं.