जगात सर्वाधिक डाउनलोड झालेले अ‍ॅप्स माहितीये का?

'या' अ‍ॅप्सपैकी तुमच्या मोबाईलमध्ये कोणते आणि किती? 

टिकटॉक आणि इन्स्टाग्राम हे दोन्ही अ‍ॅप्स एकेकाळी केवळ मनोरंजनाच्या हेतूनं बनवलेले प्लॅटफॉर्म्स होते, पण आता सर्च इंजिन' म्हणूनही ते पुढे आले आहेत.

व्यावसायिक, आणि गुंतवणूकदारांनीही त्याकडे लक्ष वळवलं आहे. त्यामुळेच २०२४मध्ये जगभरात सर्वाधिक म्हणजे ८२५ दशलक्ष टिकटॉक अकाउंट्स डाउनलोड करण्यात आले. 

दुसरा क्रमांक इन्स्टाग्रामने पटकावला. त्याचे ८१७ दशलक्ष अकाउंट्स डाऊनलोड झाले. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर होते ते फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप.

स्टॅटिस्टा डॉट कॉमच्या माहितीनुसार फेसबुक अ‍ॅप ५९८ दशलक्ष युजर्संनी डाऊनलोड केले. तर व्हॉट्सअ‍ॅप ५६४ दशलक्ष यूजर्संकडून डाऊनलोड करण्यात आले.

स्नॅपचॅट ४१० दशलक्ष यूजर्नंकडून डाऊनलोड केले गेले असून टेलिग्राम डाऊनलोड करणाऱ्या यूजर्सची संख्या आहे ३३१ दशलक्ष.

मेटा कंपनीचाच नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जो भारतासह जगभरात वापरला जातो, तो म्हणजे थ्रेड. जगभरात ३२७ दशलक्ष यूजर्संकडून हे अ‍ॅप डाऊनलोड केलं गेलं आहे.

पहिल्या क्रमांकावर असलेले टिकटॉक भारतात वापरले जात नाही. गलवान खोऱ्यात चीन-भारत लष्करी संघर्ष झाल्यानंतर भारताने त्यावर बंदी घातली होती. 

भारतात लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि थ्रेड हे एकाच कंपनीचे आहे, ते म्हणजे मार्क झुकरबर्ग यांच्या मेटाचे!

मेंदू शार्प ठेवण्यासाठी कोणते घटक महत्वाचे?

Click Here