खरं वाटणार नाही, पण भारतीय 'या' गोष्टीत आहेत आघाडीवर
नवं मॉडेल आलं? जुनं द्या फेकून!
मोबाइलचे नवनवीन मॉडेल्स आले, त्यात विविध फिचर्स अॅड झालीत की लगेच आपला मोबाइल जुना, कंडम झाला असं कोणाला सर्वाधिक वाटतं?
यात जगात आगाडीवर आहे तो भारत. त्यामुळे भारतीय लोक आपला मोबाइल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स एकतर अपग्रेड तरी करतात किंवा जुना मोबाइल टाकून नवीन मोबाइल तरी घेतात.
जुना मोबाइल व्यवस्थित सुरू असला तरी! भारतात हे प्रमाण जवळपास दोनात एक असं आहे. जगात इतर ठिकाणी हे प्रमाण तीनास किंवा चारास एक असं आहे.
स्टॅटिस्टा कन्झ्युमर इनसाइट्सनुसार, भारतात ४१ टक्के लोक जुना फोन एकतर 'टाकून' देतात किंवा तो अपग्रेड करतात!
यात दुसऱ्या क्रमांकावर आहेत ब्राझीलमधील लोक. ब्राझीलमध्ये हे प्रमाण ३६ टक्के इतकं आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे चिनी, त्यांचं प्रमाण आहे ३३ टक्के.
चौथ्या क्रमांकावरील जर्मनीत हे प्रमाण ३१ टक्के इतकं आहे. पाचव्या क्रमांकावर ३० टक्के, तर महाशक्ती असलेल्या अमेरिकेत असं करणाऱ्यांची संख्या २९ टक्के आहे.