टर्म आणि लाइफ इन्शुरन्स; दोन्हीत नेमका काय फरक? घेण्यापूर्वी जाणून घ्या

विमा घेताना लाइफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स यातील फरक बऱ्याच जणांना माहिती नसतो. 

विमा घेताना लाइफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स यातील फरक बऱ्याच जणांना माहिती नसतो. आज जाणून घेऊया, या दोन्हीत नेमका फरक काय आहे ते.

लाइफ इन्शुरन्समध्ये केवळ मृत्यूचं कव्हर मिळत नाही तर काही वर्षांनी पॉलिसी संपली आणि व्यक्ती जिवंत असेल तर त्याला निश्चित रक्कमही मिळते.

टर्म इन्शुरन्स हा विमा केवळ विशिष्ट कालावधीसाठी असतो. त्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला निश्चित रक्कम मिळते; जर विमाधारक जिवंत असेल, तर काहीही पैसे मिळत नाहीत.

तज्ज्ञांच्या मते, टर्म इन्शुरन्स वार्षिक उत्पन्नाच्या १० ते १५ पट असावा. तरुण वयात टर्म इन्शुरन्स घेतल्यास कमी हप्ता लागतो आणि तो दर लॉक होतो.

कुटुंबाची गरज, आपली जीवनशैली, कर्जाचे हप्ते आणि उत्पन्नाचे स्रोत यांचे नीट विश्लेषण करा.

टर्म पॉलिसी सर्व प्रकारच्या मृत्यूला कव्हर करीत नाही. त्यामुळे कोणत्या कारणांमुळे मृत्यू झाला तर पैसे मिळतील, यासंबंधीच्या अटी वाचून घ्या.

ऑनलाइन टर्म इन्शुरन्स खरेदी केल्यास एजंट्सचा खर्च वाचतो. प्रीमियम स्वस्त मिळतो आणि सर्व माहिती स्वतः भरल्यामुळे चुकण्याची शक्यता कमी असते.

ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड

Click Here