क्रयशक्ती समता काय, जगात इतकी महत्त्वाची का?

डॉलर विरुद्ध रुपया, पीपीपी कसा ठरतो?

क्रयशक्ती समता म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या देशांमध्ये एकाच प्रकारची वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या चलनांचे प्रमाण (Purchasing Power Parity).

हे चलनांच्या विनिमय दराकडे न पाहता, त्या चलनांमध्ये वस्तू विकत घेण्याची ताकद किती आहे, हे मोजले जाते.

उदाहरणार्थ, असं समजा की तुम्हाला भारतात एक विशिष्ट वस्तू (कपभर कॉफी) विकत घ्यायची आहे. आता हीच कॉफी अमेरिकेत खरेदी करायची आहे. या कॉफीची भारतात किंमत आहे २०० रुपये, तर अमेरिकेत चार डॉलर.

आता हेच पीपीपीनुसार मोजायचं झाल, तर २०० रुपयाला ४ डॉलरने भागायचे उत्तर आहे ५० रुपये. तर हाच ५० रुपये म्हणजे पीपीपी एक्सचेंज रेट अर्थात विनिमय दर. 

सोप्या शब्दात समजून घ्यायचं तर बाजारातील दराप्रमाणे एका डॉलरसाठी ८३ रुपये, असे बघितले तर रुपया कमकुवत आहे. पण, हेच PPP दराप्रमाणे ($1 बरोबर 50 रुपये).

म्हणजे अमेरिकेत 1 डॉलरला जी वस्तू विकत घेता येते, तिच वस्तू भारतात खरेदी करण्यासाठी तुम्हाला 83 रुपये नाही, तर फक्त 50 रुपये लागतील.

'हा' ज्यूस प्याल तर आजारापासून लांब राहाल

Click Here