पालकांच्या संपत्तीवर मुलांचा हक्क नेमका किती असतो? पाहा महत्त्वाची माहिती

आपल्या समाजात अनेकदा असा समज असतो की, पालकांच्या प्रत्येक मालमत्तेवर मुलांचा जन्मसिद्ध हक्क असतो. 

मात्र, भारतीय कायद्यानुसार हे पूर्णतः खरे नाही. संपत्तीवरील हक्क हा प्रामुख्याने ती संपत्ती ‘कशी मिळवली आहे’ यावर अवलंबून असतो. 

पालकांनी स्वतःच्या कमाईतून मालमत्ता खरेदी केली असेल, तर त्यावर मुलांचा कोणताही जन्मसिद्ध हक्क नसतो. या संपत्तीचे मालक म्हणून पालकांना ते पूर्ण अधिकार आहेत की, त्यांनी संपत्ती कोणाला द्यावी. 

पालक ही संपत्ती कोणालाही विकू शकतात किंवा भेट देऊ शकतात. मृत्युपत्राद्वारे ते ही संपत्ती त्यांच्या आवडीनुसार कोणालाही देऊ शकतात. यामध्ये इतर मुले कायदेशीर दावा करू शकत नाहीत.

जी संपत्ती गेल्या चार पिढ्यांपासून कुटुंबात आहे आणि जिचे अद्याप वाटप झालेलं नाही, तिला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. अशा मालमत्तेवर मुलांचा जन्मापासूनच अधिकार असतो.

याबाबतीत वडील एकट्यानं निर्णय घेऊ शकत नाहीत. मालमत्ता विकण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी सर्व वारसांची संमती आवश्यक असते.

जर वडिलांना त्यांच्या वडिलांकडून १९५६ नंतर वारसाहक्काने एखादी संपत्ती मिळाली असेल, तर ती देखील ‘स्वकष्टार्जित’ श्रेणीत येते. अशा मालमत्तेवर मुलांचा जन्मतः हक्क नसतो.

Click Here