एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बँकेतील पैशाचे काय? आला नवा नियम

बँकेच्या ग्राहकाचा मृत्यू झाला आणि घरच्यांनी दावा केला तर ती रक्कम तुम्हाला कधी मिळेल? जाणून घेऊ.

बँकेच्या ग्राहकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी बँकेकडून पैसे किंवा लॉकरच्या वस्तूंचा दावा केला तर आता प्रक्रिया जलद होणार आहे.

बँकेला सर्व कागदपत्रं मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. उशीर केल्यास बँकेला मोठा दंड भरावा लागेल.

बँकेला सर्व कागदपत्रं मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. उशीर केल्यास बँकेला मोठा दंड भरावा लागेल. आरबीआयचा हा नियम १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना बँकेकडून पैसे लॉकरच्या वस्तू मिळविण्यासाठी दीर्घ प्रक्रिया आणि अडचणींचा सामना करावा लागतो. 

आरबीआयच्या कठोर धोरणामुळे बँका अशा प्रकरणांमध्ये विलंब करू शकणार नाहीत. त्यामुळे खातेदाराच्या कुटुंबाला फायदा होईल

...तर बँकेला होईल दंड - जर ठेवीमध्ये विलंब झाला तर बँकेला ४ टक्के दरानं व्याज द्यावं लागेल. जर लॉकर उघडण्यास विलंब झाला तर बँकेला लॉकरधारकाच्या नामांकित व्यक्तीला दररोज ५,००० रुपये दंड भरावा लागेल.

बँक लॉकरचे नियम? नामनिर्देशित व्यक्ती किंवा संयुक्त धारकाला लॉकरसाठी तत्काळ प्रवेश मिळेल. मात्र, अशी कोणतीही व्यक्ती नसेल, तर कायदेशीर वारसांना कागदपत्रे पाहून प्रवेश मिळेल. 

लॉकर बँक अधिकारी आणि साक्षीदारांसमोर उघडले जाईल आणि त्याची माहिती नोंदवली जाईल.

ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार

Click Here