अनेक महिला इच्छा असूनही व्यवसाय सुरू करू शकत नाहीत, याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्यांना भांडवल न मिळणं. अशा महिलांसाठी बँका आणि सरकार अनेक योजना राबवत आहेत.
१. मुद्रा लोन : या योजनेंतर्गत आता २० लाखांपर्यंतचे कर्ज घेता येईल. १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला लघु उद्योगांसाठी हे कर्ज घेऊ शकतात.
२. सेंट-कल्याणी योजना - सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या या योजनेत महिलांना व्यवसायासाठी १ कोटीपर्यंतचे कर्ज दिलं जातं. हे कर्जदेखील तारणमुक्त आहे.
३. आयसीआयसीआय स्वयंसहायता गट - यात व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंतचं तारणमुक्त कर्ज दिलं जातं.
४. पीएनबी उद्योजिका योजना - यात तीन वर्षांसाठी ओव्हरड्राफ्ट सुविधा व तीन ते पाच वर्षांच्या मुदतीच्या कर्जासह १० लाखांपर्यतचे कर्ज मिळू शकतं. व्याजदर ७% आहे.
५. स्टँड अप इंडिया - केंद्र सरकारकडून स्टार्टअप्स व ग्रीनफील्ड एंटरप्रायझेससाठी १ कोटीपर्यंतचे कर्ज. १८ महिन्यांचा मेरिटोरियम कालावधी आणि ७ वर्षात परतफेड करावी लागते.
कर्ज घेण्याची प्रक्रिया व्यवसाय कल्पना प्रथम एकव्यवसाय योजना तयार करा. खर्च, किती पैसे कमावणार हे सोप्या भाषेत लिहा.
जीएसटी, उद्योग नोंदणी (जर असेल तर) आणि जर तुमचा आधीच व्यवसाय असेल तर तुमच्याकडे ३-६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट असलं पाहिजे.
नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?