या कंपनीनं भारतीय स्मार्टफोन बाजारात आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
चीनच्या स्मार्टफोन निर्माता विवो कंपनीने २०२५ च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारतीय स्मार्टफोन बाजारात आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
विवोचा बाजारातील हिस्सा १८.३ टक्के इतका नोंदवला गेला आहे. प्रीमियम स्मार्टफोन विक्रीत ४३.३% वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे.
५० लाख आयफोनचे भारतातून निर्यात करून ॲपलने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे, असे इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी) च्या अहवालात म्हटले आहे.
भारताचा स्मार्टफोन बाजार गेल्या पाच वर्षांतील उच्चतम स्तरावर पोहोचला आहे. सप्टेंबर २०२५ अखेरीस देशात ४.८ कोटी युनिटची विक्री झाली असून, ही वार्षिक आधारावर ४.३ टक्क्यांची वाढ दर्शवते.
ॲपलने भारतातील प्रीमियम (५३,००० ते ७१,००० रुपये) आणि सुपर-प्रीमियम (७१,००० पेक्षा जास्त) या दोन्ही श्रेणींमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?