बोनसचा पैसा हुशारीने वापरा, आर्थिक उद्दिष्टे साध्य करा!

कर्जातून मुक्त व्हा, गुंतवणूक करा, स्वतःवर खर्च करा; बोनसच्या पैशातून आर्थिक नियोजन करा.

नोकरी करताना मिळालेला बोनस अनेकदा अनपेक्षित आणि आनंदाची गोष्ट असते. तो खर्च करण्याचाही अनेकदा मोह होतो. बोनसचा हुशारीने वापर केल्यास, त्याचे तुमच्या आर्थिक नियोजनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात.

तुमचा बोनस कसा वापरायचा, हे ठरवण्यासाठी, तुम्ही सध्या घेतलेली कर्जे, गुंतवणुकीची उद्दिष्टे आणि तुमच्या गरजा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. 

आनंद साजरा करा : बोनसचा काही भाग स्वतःच्या आनंदासाठी वापरा. कुटुंबासोबत फिरायला जाणं, घराचं नूतनीकरण करणं किंवा घरात आवश्यक असलेली एखादी नवीन वस्तू खरेदी केल्यानं तुम्हाला आनंदही होईल.

कर्जांची परतफेड : तुमच्यावर कोणतंही जास्त व्याजदराचं कर्ज असेल तरे आधी ते फेडण्याला प्राधान्य द्या. भारतात वेगवेगळ्या कंपन्यांच्या क्रेडिट कार्डचे व्याज वर्षाला ३६ टक्क्यांपर्यंत आहे

हे व्याज कोणत्याही गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा खूप जास्त आहे. हे कर्ज फेडल्यास तुमची मोठी बचत होईल आणि तुमचा क्रेडिट स्कोअरही सुधारेल.

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वापर : तुमच्यावर कर्ज नसेल, तर बोनसची रक्कम पीपीएफ, म्युच्युअल फंड, इंडेक्स फंड किंवा एसआयपीमध्ये गुंतवा. त्यामुळे दीर्घ कालावधीत चांगला पैसा तयार होईल.

स्वतःसाठी वापर : एखादं नवीन कौशल्य शिकण, व्यावसायिक प्रशिक्षण घेणं किंवा नवीन उपकरणांची खरेदी करणं यांसारख्या गोष्टींवर खर्च करून तुम्ही स्वतःला अधिक सक्षम करू शकता.

५०-५०चा नियम : बोनसचा वापर करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे ५०-५०चा नियम पाळणं. निम्मी रक्कम कर्ज फेडण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी आणि निम्मी रक्कम तुमच्यासाठी वापरा

(टीप - कोणत्याही प्रकारचे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम

Click Here