TVS Apache RR 310 ची किंमत झाली २७ हजारांपर्यंत कमी, नवी प्राईज काय?

TVS ही भारतातील एक अतिशय लोकप्रिय दुचाकी उत्पादक कंपनी आहे. कंपनीनं आता दिलासा देत त्यांच्या TVS Apache RR 310 बाईक आणि TVS Apache RTR 310 बाईकच्या किमती कमी केल्या आहेत.

नवीन GST दर लागू झाल्यामुळे बाईकच्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे. २२ सप्टेंबरपासून नवीन GST दर लागू करण्यात आले आहेत, त्यानंतर प्रीमियम बाईकवरील GST दर २८ वरून १८ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत.

टीव्हीएस मोटर कंपनीनं त्यांच्या टीव्हीएस अपाचे आरआर ३१० आणि टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० बाईक्सच्या किमतीत २६,९०९ रुपयांपर्यंत कपात केली आहे.

TVS Apache RR 310 ची नवीन सुरुवातीची किंमत आता २५६,२४० आहे. कंपनीनं किंमत २१,७५९ ने कमी केली आहे. 

TVS Apache RR 310 च्या टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत देखील २६,९०९ ने कमी करण्यात आली आहे, ज्यामुळे टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत ३१७,०९० झाली आहे. 

TVS Apache RTR 310 ची नवीन सुरुवातीची किंमत आता २२१,२४० आहे. कंपनीनं या बाईकची किंमत १८,७५० ने कमी केली आहे. 

याव्यतिरिक्त, TVS Apache RTR 310 च्या टॉप व्हेरिएंटची किंमत २४,८६० ने कमी केली आहे, ज्यामुळे टॉप व्हेरिएंटची किंमत २९३,१४० वर आली आहे. 

₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर

Click Here