जगातील टॉप ५ सर्वात महागडे शेअर्स

वॉरेन बफेट यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीचा एक शेअर ७४०,३९५.५० डॉलर, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ६.३४ कोटी रुपयांना आहे.

स्विस चॉकलेट बनवणारी लिंड्ट अँड स्प्रुंगली एजी कंपनीचा एक शेअर १२९,०००.०० स्विस फ्रँक, म्हणजे सुमारे १,०८,००,००० रुपये आहे.

अमेरिकेतील गृहनिर्माण क्षेत्रातील मोठी कंपनी एनव्हीआर इंक.च्या एका शेअरची किंमत ७,११६.५३ डॉलर, म्हणजेच सुमारे ५,९१,००० रुपये आहे.

Booking.com आणि Priceline यांसारख्या प्रसिद्ध ट्रॅव्हल साईट्सची मूळ कंपनी बुकिंग होल्डिंग्जच्या एका शेअरची किंमत ५,६१४.६१ डॉलर, म्हणजेच सुमारे ४,६६,००० रुपये आहे.

अमेरिकेतील ऑटोमोटिव्ह पार्ट्सची आघाडीची किरकोळ विक्रेता ऑटोझोन इंक.च्या एका शेअरचे मूल्य ३,७१५.३९ डॉलर, म्हणजे सुमारे ३,०८,००० रुपये आहे.

भारतात जर सर्वात महागड्या शेअरची चर्चा करायची झाल्यास, एमआरएफ हा आघाडीवर आहे. १४ जुलै २०२५ रोजी त्याच्या एका शेअरची किंमत १,४८,५७०.२० रुपये होती.

तज्ज्ञांच्या मते, केवळ जास्त शेअर किंमत म्हणजे जास्त मूल्यमापन असे नाही. गुंतवणूकदारांनी मार्केट कॅप, कमाई आणि वाढीची क्षमता यांसारख्या इतर गोष्टीही पाहिल्या पाहिजेत.

योग्य गुंतवणूक पर्याय निवडण्यासाठी नेहमीच आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. कोणत्याही योजनेत विचार न करता पैसे गुंतवू नका.

Click Here