जगातील 'हे' देश आहेत टॅक्स फ्री!

चला जाणून घेऊया, कोणत्या देशांमध्ये आकाराला जात नाही टॅक्स!

आयकर अर्थात इन्कम टॅक्स हा सरकारच्या कमाईचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे. 

जगातील बहुतांश देश नागरिकांकडून टॅक्स आकारतात. मात्र आजही काही देश टॅक्स फ्री आहेत.

चला तर जाणून घेऊया, कोणत्या देशांमध्ये आकाराला जात नाही टॅक्स!

सगळ्या मोठ्या देशांमध्ये करांचे नियम जवळपास सारखेच आहेत. मात्र, आखाती देश आणि युरोपियन देशांसाठी हे नियम वेगळे आहेत. 

संयुक्त अरब अमिरातीमध्ये नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा कर वसूल केला जात नाही. 

बहरीन या देशात देखील आयकर आकारला जात नाही. कोणत्याही कमाईवर कर द्यावा लागत नाही.

कुवेत या देशात देखील लोकांकडून सरकार कोणताही थेट कर वसूल करत नाही.

सौदी अरेबियामध्येही नागरिकांना आपल्या कमाईतून कोणताही कर सरकारला द्यावा लागत नाही. 

याशिवाय बहामास, ब्रूनेई, कतार आणि मोनॅको हे देश देखील करमुक्त देश आहेत.

करमुक्त असणारे हे देश तेल, इंधन व्यापार आणि पर्यटन या माध्यमातून कमाई करतात, म्हणून नागरिकांना यातून सूट मिळते.     

Click Here