पहिल्याच दिवशी ९९% चा फायदा, IPO चं जबरस्त लिस्टिंग; गुंतवणूकदारांची कमाई दुप्पट

शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

TechD सायबर सिक्युरिटी लिमिटेडच्या शेअर्सचं आज जबरदस्त लिस्टिंग झालं. कंपनीचे शेअर्स NSE SME मध्ये ९० टक्के प्रीमियमसह ३६६.७० रुपयांवर लिस्ट झाले आहेत. 

त्यामुळे गुंतवणूकदारांना एका शेअरवर १७३.७० रुपयांचा फायदा झाला आहे. या SME सेगमेंटच्या IPO चा प्राइस बँड १८३ ते १९३ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता

कंपनीनं IPO साठी ६०० शेअर्सचा लॉट साईज बनवला होता. पण कोणत्याही किरकोळ गुंतवणूकदारांना किमान २ लॉटसाठी २३१६०० रुपये गुंतवावे लागणार होते

लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सना ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. त्यानंतर TechD सायबर सिक्युरिटीचे शेअर्स ३८५ रुपयांच्या पातळीवर पोहोचले. 

TechD सायबर सिक्युरिटी लिमिटेडच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी भरभरून पैसा लावला होता. कंपनीचा IPO ७१८.३० पट सबस्क्राइब झाला होता. 

रिटेल कॅटेगरीमध्ये कंपनीच्या IPO ला ३ दिवसांच्या ओपनिंगदरम्यान ७२६.०६ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. QIB मध्ये २८४.१७ पट आणि NII कॅटेगरीमध्ये १२७९.०३ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं.

(टीप - हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम

Click Here