प्रत्येक एफडी ही सारखी नसते. यातही काही प्रकार आहेत.
सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्यासाठी बँक एफडी हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. परंतु प्रत्येक एफडी ही सारखी नसते. यातही काही प्रकार आहेत.
काही एफडींत गुंतवणुकीवर कर आकारला जातो तर काही एफडीत करसवलतीचा मोठा फायदा मिळतो. या एफडी नेमक्या कोणत्या हे जाणून घेऊ...
नियमित एफडीमध्ये मॅच्युरिटी कालावधी सात दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत असतो. गुंतवणुकीची रक्कम आणि कालावधीनुसार व्याजदर बदलतात.
मुदतपूर्ती तारखेपूर्वी एफडीदेखील मोडली जाऊ शकते. परंतु असं केल्यानं व्याजदरात काही दंड होऊ शकतो.
यात वार्षिक ४० हजारपेक्षा जास्त उत्पन्न तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते आणि त्यावर स्लॅब दरानुसार कर आकारला जातो.
टॅक्स सेव्हर एफडीमध्ये ८०सी अंतर्गत, दरवर्षी जास्तीत जास्त १,५०,००० रुपयांची कर सूट उपलब्ध आहे. त्यामुळे मोठा फायदा होतो.
या एफडीचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा आहे, म्हणजेच तुम्ही पाच वर्षांसाठी गुंतवणूक काढू शकत नाही.
किमान गुंतवणूक रक्कम १०,००० व कमाल गुंतवणूक रक्कम १,५०,००० रुपये आहे. याला जॉईंट खातं म्हणूनदेखील उघडता येते.
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती