TATAची सर्वात स्वस्त कार आता आणखी स्वस्त! ५ लाखांपेक्षा कमीमध्ये खरेदी करण्याची संधी
लोनवर घेतल्यास किती लागेल EMI, जाणून घ्या.
जीएसटीमध्ये कपात झाल्यामुळे टाटाची सर्वात स्वस्त कार आता आणखी स्वस्त झाली आहे. ही कार आहे टाटा टियागो. या कारची किंमत आता ५ लाख रुपयांपेक्षाही कमी झाली आहे.
नुकतीच, सरकारनंजीएसटीमध्ये मोठी कपात केली आहे, ज्यामुळे देशातील अनेक कार्सच्या किमती कमी झाल्या आहेत. जीएसटीकपातीमुळे टाटा मोटर्सनेही आपल्या विविध कार्सच्या किमती कमी केल्यात.
टाटा मोटर्सने टाटा टियागोच्या किमतीत एकूण १.२० लाख रुपयांची कपात केली आहे. त्यानंतर टाटा टियागोची सुरुवातीची किंमत ४.५७ लाख रुपये झाली आहे.
यामध्ये जीएसटीमुळे ७५,००० रुपयांची कपात करण्यात आली आहे, तर कंपनी स्वतःहून ४५,००० रुपयांचा अतिरिक्त लाभ देत आहे. हा अतिरिक्त लाभ केवळ ३० सप्टेंबरपर्यंतच उपलब्ध आहे.
जर तुम्ही दिल्लीमध्ये टाटा टियागो खरेदी करत असाल, तर ही कार तुम्हाला एकूण ५,१४,६४० रुपयांना पडेल. यामध्ये नोंदणी, विमा आणि इतर खर्च समाविष्ट आहेत.
१ लाख रुपयांचं डीपी केले, तर तुम्हाला ४.१४ लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर हे कर्ज तुम्हाला ९ टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी मिळाले, तर तुम्हाला दरमहा १३,१६५ रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील.
दरमहा १३,१६५ रुपयेईएमआय म्हणून सलग ३ वर्षे भरल्यास, तुम्ही बँकेला एकूण ४.७३ लाख रुपये परत कराल. यामध्ये ५९,९४३ रुपये केवळ व्याज असेल. अशा प्रकारे, कार एकूण ५९,९४३ रुपये जास्त महाग पडेल.
बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक