टाटा समूहात कोणाचं पारडं आहे जड? नोएल टाटा की आणखी कोण...?

टाटा समूह टाटा ट्रस्ट्सद्वारे चालवला जातो. टाटा सन्स ही या समूहाची होल्डिंग कंपनी आहे, म्हणजेच समूहातील सर्व कंपन्यांचे कामकाज आणि नियंत्रण याच कंपनीमार्फत होते. 

टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्ट्सची ६६% भागीदारी आहे, म्हणजेच अप्रत्यक्षपणे टाटा ट्रस्ट्स हे संपूर्ण समूहाचे मालक आहेत. ट्रस्टींच्या मतानुसार टाटा ट्रस्ट्स समूहाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतात.

नोएल एन टाटा हे सध्या टाटा ट्रस्ट्सचे चेअरमन आहेत. ते टाटा समूहाचे धोरण ठरवणारे सर्वात महत्त्वाचे व्यक्ती मानले जातात. नोएल टाटा यांचा टाटा समूहाशी गेल्या ४० वर्षांपेक्षा जास्त काळ संबंध आहे.

दुसरे सर्वात महत्त्वाचे व्यक्ती एन. चंद्रशेखरन हे आहेत. ते टाटा सन्सचे चेअरमन आहेत. ही सर्व कंपन्यांची मूळ कंपनी आहे. चेअरमन असल्यानं चंद्रशेखरन हे समूहाचे रोजचे सर्व निर्णय घेतात.

वेणु श्रीनिवासन हे टाटा ट्रस्ट्सचे उपाध्यक्ष आहेत. ते टाटा सन्सच्या बोर्डाचे सदस्य देखील आहेत आणि टाटा सन्स बोर्डात टाटा ट्रस्ट्सचे प्रतिनिधित्व करतात.

मेहली मिस्री हे देखील टाटा ट्रस्ट्सचे ट्रस्टी आहेत. मुंबईचे व्यावसायिक असलेले मिस्री हे ऑक्टोबर २०२२ मध्ये टाटा ट्रस्ट्समध्ये आले. ते एम. पल्लोनजी समूहाच्या कंपन्यांचे संचालन करतात.

पुण्याचे व्यावसायिक असलेले जहांगीर एच. सी. जहांगीर हे एक रुग्णालय चालवतात. त्यांनी २०२२ मध्ये ट्रस्टी म्हणून टाटा ट्रस्ट्स जॉइन केलं.

टाटा ट्रस्ट्समध्ये डेरियस खंबाटा हे देखील ट्रस्टी आहेत. ते ज्येष्ठ अधिवक्ता आहेत आणि त्यांनी विविध प्रकरणांमध्ये न्यायालयांमध्ये टाटा समूहाची बाजू मांडली आहे.

रतन टाटा यांचे लहान भाऊ जिमी टाटा हे देखील टाटा ट्रस्ट्सचे ट्रस्टी आहेत. परंतु, त्यांना टाटा समूहाच्या कामकाजात जास्त रस नाही. ते सामान्यतः शांत आणि खासगी जीवन पसंत करतात.

दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल

Click Here