'आधार' हा पुरावा नाही तर 'या' योजना कशा चालतील?

आधार कार्डला ओळख किंवा नागरिकत्वाचा पुरावा म्हणून मान्यता देऊ शकत नाही, असं न्यायालयानं म्हटलंय

सर्वोच्च न्यायालयानं मतदार यादीच्या वादावर सुनावणी करताना आधार कार्डला ओळख किंवा नागरिकत्वाचा पुरावा म्हणून मान्यता देऊ शकत नाही, असं म्हटलं

यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 'आधार' ओळख म्हणून मान्य नसेल तर सरकारी योजनांत त्याचा काय उपयोग राहील? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बँक खातं : बँक खातं उघडताना आधार हे ओळख आणि केवायसी प्रमाणपत्र म्हणून वापरले जाते. जनधन योजनेतही हे मान्य आहे.

रेशन योजना: सार्वजनिक वितरण योजनेअंतर्गत बायोमेट्रिक ओळखीसाठी आधार कार्ड वापरलं जातं.

पेन्शन योजना: पेन्शन मिळवण्यासाठी तसंच डिजिटल लाइफ सर्टिफिकेटसाठी आधार कार्ड वापरतात.

डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर : सरकारकडून थेट लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करताना आधार हे ओळख प्रमाण म्हणून वापरलं जातं.

गॅस सबसिडी : गॅस सबसिडी घेण्यासाठीही आधार अनेक एजन्सी अनिवार्य मानतात.

मोबाइल सिम आणि बँकिंग केवायसी : मोबाइल सिम आणि बँकिंग सेवांसाठी आधार हे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून मागितलं जातं.

२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ

Click Here