SIP मध्ये गुंतवणूक करताय? 'या' चुका टाळा

जारातील चढ-उतारांना घाबरुन अनेकदा गुंतवणूकदार अनावश्यक निर्णय घेतात.

आजकाल अनेक जण एसआयपीमध्ये गुंतवणूक करत आहेत. परंतु बाजारातील चढ-उतारांना घाबरुन अनेकदा गुंतवणूकदार अनावश्यक निर्णय घेतात. तर पाहूया नक्की कोणत्या चुका टाळाव्या.

SIP बाजारात घसरण सुरू असताना घाबरून एसआयपी थांबवणे ही मोठी चूक ठरते. घसरणीच्या काळातच अधिक युनिट्स जमा होतात. 

जेव्हा इक्विटीमधील गुंतवणूक ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होते, तेव्हाच नफा काढून तो सोने किंवा डेट फंडात वळवावा. 

एसआयपी धोरणात वारंवार बदल करू नका. त्याची गरज नसते. गुंतवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी दर सहा महिन्यांनी केलेला आढावा पुरेसा ठरतो.

आपली आर्थिक ध्येये आणि बाजारपेठेतील स्थितीनुसार गुंतवणुकीचे संतुलन राखण्यासाठी वर्षातून एकदा सविस्तर आढावा घेणं हिताचं असतं. आढावा टाळणं घातक ठरू शकतं.

जागतिक तणाव पाहता, आंतरराष्ट्रीय फंडांमधील गुंतवणूक १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.

जर फंड सातत्यानं आपल्या श्रेणीतील इतर फंडांच्या तुलनेत किंवा निर्देशांकापेक्षा सलग दीड-दोन वर्षे मागे पडत असेल, तरच तज्ज्ञांच्या सल्ल्यानं दुसऱ्या चांगल्या फंडात गुंतवणूक वळवण्याचा विचार करावा.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Click Here