"Iphone 17 ऐवजी म्युच्युअल फंडात टाका पैसे, दुप्पट होतील"

दिग्गज गुंतवणूकदारानं दिला सल्ला. पाहा म्युच्युअल फंडाबद्दल काय म्हटलंय त्यांनी?

शुक्रवारपासून भारतात आयफोन १७ च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. परंतु किंमत पाहता ‘आयफोन खरेदी करणे योग्य आहे की गुंतवणूक करणं?’ या चर्चेनं जोर धरला आहे. 

या चर्चेत आता दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनीही आपलं मत मांडलंय. त्यांनी लोकांना आयफोन १७ ऐवजी एक लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याचा सल्ला दिला आहे.

एक लाख रुपये शेअर बाजारात गुंतवण्याचा अर्थ तंत्रज्ञानाला दुर्लक्षित करणं असा अजिबात नाही. परंतु सध्या शेअर बाजारात मिळणारी संधी भविष्यासाठी खूप चांगली आहे, असं केडिया म्हणाले.

आयफोन १७ खरेदी करण्यापूर्वी हे वाचा. आयफोन १७ प्रत्येकासाठी नाही. तुम्ही १ लाख रुपये सर्वाधिक चर्चेत असलेल्या फोनसाठी खर्च करणार की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणार?"

पुढील ६ वर्षांत शेअर बाजारात गुंतवलेले १ लाख रुपये वाढून २ लाख रुपये होतील. तर, आयफोनची रिसेल व्हॅल्यू १५ हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकते, असंही ते म्हणालेत.

“जर तुम्ही त्या गर्दीत असाल, तर आयफोन तुमच्यासाठी नाही. तुमच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. अशावेळी म्युच्युअल फंड तुमच्यासाठी आहे. चला आता परत येऊया.”

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?

Click Here