SBI मध्ये ५ वर्षांसाठी ₹१,२५,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन

बचत सुरक्षित ठेवून चांगला परतावा मिळवण्यासाठी एफडी हा एक विश्वासार्ह पर्याय मानला जातो. विशेषतः स्टेट बँक सारख्या मोठ्या बँकेत गुंतवणूक करण्यावर लोकांचा अधिक विश्वास असतो. 

पण जर तुम्ही आज ₹१,२५,००० ची रक्कम ५ वर्षांच्या एफडीमध्ये जमा केली, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला नेमके किती पैसे मिळतील? 

बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, एसबीआय ५ वर्षांपेक्षा जास्त आणि १० वर्षांपर्यंतच्या एफडी योजनेवर सामान्य ग्राहकांना ६.०५ टक्के व्याज देत आहे. 

तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ७.०५ टक्के इतका आहे. म्हणजेच तुम्ही ५ वर्षांसाठी एफडी केली, तर तुम्हाला या दराने परतावा मिळेल.

जर तुम्ही सामान्य ग्राहक असाल आणि ५ वर्षांच्या एफडीमध्ये ₹१,२५,००० गुंतवले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला ₹४२,६७३ केवळ व्याजापोटी मिळतील. म्हणजेच ५ वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण ₹१,६७,६७३ जमा होतील.

जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक (६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय) असाल आणि ₹१,२५,००० ची रक्कम ५ वर्षांच्या एफडीमध्ये जमा केली, तर तुम्हाला ₹५०,७२९ व्याज मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीवर एकूण ₹१,७५,७२९ मिळतील.

Click Here