आज आपण एसबीआयच्या एका एफडी स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यात फक्त १ लाख रुपये जमा करून २२,४१९ रुपयांचं फिक्स्ड व्याज मिळू शकतं.
ग्राहकांना एफडीवर ३.३० टक्के ते ७.१० टक्के व्याज मिळत आहे. ४४४ दिवसांच्या विशेष अमृतवृष्टीएफडी वर सामान्य नागरिकांना ६.६० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.१० टक्के व्याज मिळतं.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ३ वर्षांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना ६.३० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.८० टक्के व्याज देत आहे.
३ वर्षांच्या एफडीमध्ये १,००,००० रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,२०,६२६ रुपये मिळतील, ज्यामध्ये २०,६२६ रुपयांचा निश्चित व्याज समाविष्ट आहे.
जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि ३ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,२२,४१९ रुपये मिळतील, ज्यामध्ये २२,४१९ रुपयांचा निश्चित व्याज समाविष्ट आहे.