पगार वाढले ६%, शाळेची फी वाढली १२%, आता काय करायचं?
वेतन सरासरी ६ टक्क्यांपर्यंत वाढत असताना शुल्क जवळपास दुपटीने १२ टक्क्यांपर्यंत वाढताना दिसून येतं.
पालकांचं वेतन आणि शाळेचे शुल्क यांच्यातील वाढीचा वेग नेहमीच व्यस्त राहतो. वेतन सरासरी ६ टक्क्यांपर्यंत वाढत असताना शुल्क जवळपास दुपटीने १२ टक्क्यांपर्यंत वाढताना दिसून येतं.
यांचा मेळ कसा घालायचा, याबाबत आज जाणून घेऊ या. शाळा विकास निधीसह इतरही अनेक छुप्या शीर्षाखाली पैसे वसूल करतात.
ते शुल्काच्या कक्षेत येत नसल्यामुळे कायद्याच्या कचाट्यातून सुटतात. शिवाय पुस्तकं व इतर शालेय खर्चही असतोच. शाळेच्या शुल्कवाढीत पारदर्शकता राहील, यासाठी शाळेच्या प्रशासनाकडे आग्रह धरा.
पालकांनी एकत्र येऊन अतिरिक्त शुल्क वाढीचा मुद्दा प्रशासनाकडे उपस्थित करावा.
पालकांना फटका कसा? शुल्काचा फारसा परिणाम पालकांच्या जमा-खर्चावर जाणवत नाही. मात्र, काही वर्षे गेल्यानंतर त्याचा परिणाम दिसतो. पालकांना बचत वापरावी लागतेय.
प्रसंगी कर्जही घ्यावं लागतंय. पूर्वी केवळ महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्ज घेतली जात असत. आता शालेय शिक्षणासाठीही ती घेतली जातात.
असा करा मुकाबला : शाळेचे मासिक शुल्क लक्षात घेत नियोजन करा. इतर छुपे शुल्क, वह्या, पुस्तके, गणवेश, पेन-पेन्सिली, स्कूल बसचा खर्च आदी सर्व खर्चाची मोजदाद करा.
दरवर्षी शुल्क वाढ होईल, हेही गृहीत धरा. त्यासाठी थोडी थोडी बचत करून पैसे बाजूला ठेवा. म्हणजे पुढच्या वर्षी शुल्क वाढेल, तेव्हा तुमचे बजेट कोलमडणार नाही.
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?