RBI च्या कडक पावलांनंतर रुपयाची ऐतिहासिक झेप; १२ वर्षांतील सर्वात मोठी तेजी
रिझर्व्ह बँकेनं उचललेल्या कडक पावलांनंतर रुपयाने १२ वर्षांतील सर्वात मोठी तेजी नोंदवली आहे. ६ एप्रिल रोजी रुपयाचे मूल्य ०.३% नं वधारलं असून तो प्रति डॉलर ९२.८३ वर पोहोचला.
यापूर्वी गुरुवारी रुपयामध्ये १.८% ची मोठी उसळी पाहायला मिळाली होती, जी सप्टेंबर २०१३ नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी वाढ ठरली आहे.
ब्लूमबर्गनं 'सीआर फॉरेक्स'चे व्यवस्थापकीय संचालक अमित पबारी यांच्या हवाल्यानं माहिती दिली की, मुदतीपूर्वी बँका आपल्या पोझिशन्स संपवतील, ज्यामुळे रुपया मजबूत होऊन ९१.५० ते ९२ च्या दरम्यान पोहोचू शकतो.
शुक्रवारी 'गुड फ्रायडे' निमित्त स्थानिक बाजार बंद होते, त्यानंतर आज ही वाढ दिसून आली. रुपयाच्या या मजबुतीमागे RBI ने घेतलेले कडक निर्णय हे मुख्य कारण आहे.
केंद्रीय बँकेनं बँकांची डॉलर पोझिशन्स १०० मिलियन डॉलर्सपर्यंत मर्यादित केली आहे. तसंच, ऑफशोर ट्रेडिंगचे मोठे माध्यम असलेल्या NDF वर बंदी घातली असून सट्टेबाजीच्या व्यवहारांवरही कडक निर्बंध लादले आहेत.
आरबीआयच्या या सर्व उपाययोजनांमुळे बाजारातील डॉलरची मागणी घटली आणि रुपया अधिक मजबूत झाला.
सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर