जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करून मोठा निधी उभा करायचा असेल, तर पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही अगदी लहान रकमेपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी बचतीचा हा एक सुरक्षित मार्ग आहे.
सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर वार्षिक ६.७% दराने व्याज मिळत आहे. हे व्याज तिमाही आधारावर चक्रवाढ पद्धतीनं मोजलं जातं.
तुम्ही या योजनेत दरमहा किमान १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.
पोस्ट ऑफिस आरडी खातं ५ वर्षांसाठी उघडलं जातं. जर तुम्हाला ही गुंतवणूक पुढे सुरू ठेवायची असेल, तर तुम्ही ती पुढील ५ वर्षांसाठी वाढवू शकता.
कोणताही भारतीय नागरिक या योजनेत आपलं खातं उघडू शकतो. तसंच, अल्पवयीन मुलांच्या नावानंही पालकांना खातं उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे.
जर तुम्हाला पैशांची तातडीची गरज भासली, तर तुम्ही तुमच्या आरडी खात्यावर कर्ज देखील घेऊ शकता. खात्यात जमा असलेल्या रकमेच्या ५०% पर्यंत कर्ज मिळू शकते.
खातं उघडल्यापासून ३ वर्षांनंतर तुम्ही तुमचं आरडी खातं मुदतपूर्व बंद करू शकता. मात्र, अशा वेळी तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्यानुसार व्याज मिळेल.
जर तुम्ही दरमहा ७,००० रुपयांची गुंतवणूक केली, तर ५ वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर सुमारे ५ लाख रुपयांहून अधिक निधी मिळू शकतो.