Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चंफिक्स व्याज; कोणती आहे स्कीम?
या स्कीममध्ये १ लाख रुपये जमा करून १४,६६३ रुपयांचे निश्चित व्याज मिळू शकतं.
केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या पोस्ट विभागानं आपल्या ग्राहकांसाठी चालवल्या जाणाऱ्या मुदत ठेव योजनेच्या व्याजदरात बदल केला आहे.
आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्याटीडी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये फक्त १ लाख रुपये जमा करून १४,६६३ रुपयांचे निश्चित व्याज मिळू शकतं.
पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी टीडी खातं उघडता येतं. पोस्ट ऑफिसनं २ वर्षे आणि ३ वर्षांच्या टीडीवरीलव्याजदर कमी केलेत.
२ वर्षांच्या टीडीवरीलव्याजदर ७.० टक्क्यांवरून ६.९ टक्के आणि ३ वर्षांच्या टीडीवरीलव्याजदर ७.१ टक्क्यांवरून ६.९ टक्के केले आहेत. याशिवाय, ५ वर्षांच्या टीडीवरीलव्याजदर ७.५ वरून ७.७ टक्के केलाय
जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये २ वर्षांच्या टीडी योजनेत १ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,१४,६६३ रुपये मिळतील.
यामध्ये तुमच्या १,००,००० रुपयांच्यागुंतवणुकीव्यतिरिक्त १४,६६३ रुपयांचं निश्चित व्याजाचा समावेश आहे. पोस्ट ऑफिसचीटीडी योजना अगदी बँकांच्या एफडीयोजनेसारखीच आहे.
पोस्ट ऑफिस टीडी योजनेत, ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर निश्चित व्याज मिळतं. पोस्ट ऑफिस केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करते, याचा अर्थ असा की त्यात जमा केलेले तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बॅंक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?