तुमच्या पैशांसाठी सुरक्षित आणि चांगला परतावा शोधत आहात?
तर पोस्ट ऑफिसच्या या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.
या योजनांमध्ये तुमच्या गुंतवणुकीला १००% सरकारी सुरक्षा मिळते.
८.२% पर्यंत आकर्षक व्याजदर आणि कर सवलतीचाही लाभ मिळतो.
५ वर्षांच्या FD वर ७.५% व्याज आणि टॅक्समध्ये सूट मिळते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी SCSS मध्ये ८.२% पर्यंत सर्वाधिक परतावा आहे.
मुलींच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा एक उत्तम पर्याय आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये ७.५% व्याज मिळते.
किसान विकास पत्र (KVP) मध्ये तुमची गुंतवणूक १० वर्षांत दुप्पट होते.
आजच तुमच्यासाठी योग्य योजना निवडा आणि तुमच्या भविष्याला सुरक्षित करा!