आठ लाखांचे ईएमआय भरले; कर्ज फक्त ८२,००० रुपये कमी झालं, असं का?

तुम्हीही जर कर्ज घेतलं असेल तर ही गोष्ट तुम्हालाही दिसली असेल. पण असं का होतं जाणून घेऊया.

मोहितनं ३० वर्षांसाठी ३० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले. त्यांचा मासिक हप्ता (ईएमआय) २२,०१३ रुपये होता. 

तीन वर्षांत त्यांनी जवळपास ८ लाख रुपये ईएमआय भरले, पण बँकेच्या स्टेटमेंटमध्ये पाहिलं असता कर्ज (मुद्दल) फक्त ८२ हजारांनीच कमी झालं होतं. 

उरलेले सर्व पैसे फक्त व्याजासाठी गेले. हा धक्का कोणालाही आश्चर्यचकित करू शकतो. कर्ज जसंच्या तसं का राहतं? उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

कर्जाच्या सुरुवातीला थकबाकीची रक्कम सर्वाधिक आणि त्यावर आकारलं जाणारं व्याजदेखील जास्त असते. त्यामुळे सुरुवातीला, ईएमआयचे बहुतेक पैसे व्याज भरण्यासाठी खर्च होतात आणि कर्ज खूपच कमी कमी होतं.

५० लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी ८.५% वार्षिक व्याजदराने घेतलं तर ईएमआय ४३,३९१ रुपये होतो. 

पहिल्या महिन्यात या ईएमआयचे ३५,४०० रुपये व्याजात जातील आणि मुद्दलात फक्त ८,००० रुपये कमी होतील. पण, १० वर्षांनंतर हळूहळू व्याज कमी, मूळ रक्कम जास्त भरली जाते.

Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास

Click Here