एकावर १० बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी

दिग्गज कंपनीनं केली रेकॉर्ड डेटची घोषणा, ४० टक्क्यांनी वधारलाय शेअर

बुधवारी व्यवहारादरम्यान ओरिएंट टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे ​​शेअर्स फोकसमध्ये होते. बुधवारी कंपनीचे शेअर्स १८% वाढून ४६४.३० रुपयांवर पोहोचले. 

यापूर्वी, मंगळवारी शेअर २०% नं वाढला होता, म्हणजेच तो फक्त दोन दिवसांत जवळपास ४०% वाढला आहे. शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमागील कारण म्हणजे बोनस शेअर्सची घोषणा. 

कंपनी तिच्या शेअरहोल्डर्सना १:१० च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार असून आणि त्याला मान्यता दिली आहे. कंपनीनं आता रेकॉर्ड डेट जाहीर केली.

कंपनीनं बोनस शेअर जारी करण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी ५ जानेवारी २०२६ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. 

वर्षभराच्या आधारावर, ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या शेअरच्या किमतीत १०.१८ टक्के घट झाली आहे, तर एनएसई निफ्टी ५० कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये १०.०४ टक्के वाढला आहे. 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन

Click Here