भारतात सोन्याकडे केवळ दागिना म्हणून नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. एका अहवालानुसार, भारतीय ग्राहक आता दागिन्यांच्या तुलनेत गुंतवणुकीसाठी सोने खरेदीला अधिक पसंती देत आहेत.
चालू आर्थिक वर्षात एकूण सोनं खरेदीत गुंतवणुकीचा वाटा ४०% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. रेटिंग एजन्सी ‘केअरएज’ ने सोमवारी अहवाल प्रसिद्ध केला आहे.
एकूण सोने खरेदीमध्ये दागिन्यांचा वाटा जो पूर्वी सरासरी ७० टक्के असायचा, तो २०२५ मध्ये ६० टक्क्यांच्या खाली आला आहे.
याउलट, गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
भारतीय आता दागिन्यांऐवजी सोन्याची नाणी, विटा आणि ‘गोल्ड ईटीएफ’ला अधिक पसंती देत आहेत.
ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?