वृत्तपत्र विक्रेत्यांना किती कमिशन मिळते...

Click Here

अनेकांना वृत्तपत्र वाचल्याशिवाय चैन पडत नाही. हे वृत्तपत्र तुमच्यापर्यंत पोहोचविण्यामागे हजारो हात असतात.

वृत्तपत्राचे पान तयार करण्यापासून ते तुमच्यापर्यंत पोहोचविण्यापर्यंत रात्रभर काम सुरु असते. 

पत्रकार बातम्या आणतात, संपादकीय विभाग त्यावर संस्कार करतो. ती बातमी पानावर घेतली जाते तो डीटीपी विभाग.

पुढे ही पाने प्रिटिंग प्रेसमध्ये पेपरवर प्रिंट केली जातात. गठ्ठेच्या गठ्ठे करून ते तुमच्या गावापर्यंत पोहोच केले जातात. 

खरेतर वृत्तपत्राचा हा सगळा छपाई, पोहोचविण्याचा खर्च हा प्रचंड असतो. 

जाहिरातीतून तो खर्च भागविला जातो आणि ते वृत्तपत्र तुमच्यापर्यंत ५-७ रुपयांत पोहोच केले जाते. 

अनेक पेपर टाकण्याचा व्यवसाय करणारे लोक शेकडो प्रती वितरित करतात. 

एका पेपरमागे या वृत्तपत्रविक्रेत्याला दीड रुपये ते दोन-तीन रुपये कमिशन दिले जाते. 

इंग्रजी, मराठी, हिंदी अशा विविध भाषांत विविध कंपन्यांची वृत्तपत्रे हे विक्रेते पोहोच करतात. 

ज्या दिवशी जादा पाने असतात त्या दिवशी त्यांचे कमिशनही वाढलेले असते. 

शिवाय बोनस, चांगल्या कामाची, विक्रीची पोहोच या विक्रेत्याला वेळोवेळी दिली जाते. 

जेवढी जास्तीची विक्री तेवढे जास्त कमिशन या वृत्तपत्र विक्रेत्यांना मिळत असते. 

शहर आणि ग्रामीण भाग या प्रमाणे हे कमिशन वेगवेगळे असू शकते. 

Click Here