नव्या 'आयकर विधेयक २०२५'मध्ये सामान्य करदात्यांसाठी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांनी सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या नव्या 'आयकर विधेयक २०२५'मध्ये सामान्य करदात्यांसाठी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
टॅक्स रिफंड : उशिराने रिटर्न भरणाऱ्यांनाही आता रिफंड मिळेल.
डिव्हिडंडवरील सवलत : एका कंपनीला दुसऱ्या कंपनीकडून मिळालेल्या ८० लाख रुपयांपर्यंतच्या डिव्हिडंडवर आता टॅक्स लागणार नाही.
NIL-TDS : टॅक्स भरावा लागत नाही, त्यांना आधीच NIL-TDS सर्टिफिकेट.
नियम सोपे : पीएफ, अॅडव्हान्स रूलिंग फी, पेनल्टीचे नियम सोपे.
रिकाम्या घरांना दिलासा : घर रिकामं असताना अंदाजे भाड्यावर टॅक्स लावण्याचा नियम रद्द.
हाऊस प्रॉपर्टीवरील कपात : घरभाड्याच्या उत्पन्नातून महानगरपालिकेचा कर आणि कर्जाचे व्याज वजा करून, उरलेल्या रकमेवर ३० टक्केची सूट नेहमीप्रमाणे मिळेल.
पेन्शनचा फायदा : जे सरकारी कर्मचारी नाहीत, त्यांनाही आता कम्युटेड पेन्शनवर टॅक्समध्ये सूट मिळेल. कोट्यवधी लोकांना फायदा.
नव्या आयकर विधेकानं तुम्हाला कोणते फायदे व सूट मिळणार?