६ महिन्यांत पैसे केले दुप्पट, आता कंपनी देतेय बोनसशेअर; डिविडंडचीही घोषणा, तुमच्याकडे आहे का?
या कंपनीनं गुंतवणूकदारांचे पैसे सहा महिन्यांमध्ये दुप्पट केले आहेत.
काही शेअर्स असे आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा कमवून दिला आहे. तर असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलंय.
परंतु आता गुंतवणूकदारांचे पैसे फक्त ६ महिन्यांत दुप्पट करणारी कंपनी व्हॅलिअंट कम्युनिकेशन्स लिमिटेडनंबोनसशेअर्स देण्याची घोषणा केली आहे.
शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत, व्हॅलिअंट कम्युनिकेशन्स लिमिटेडनं म्हटलंय की १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या २ शेअर्सवर १ शेअर बोनस दिला जाईल.
दरम्यान कंपनीनं अद्याप या बोनसशेअरचीरेकॉर्डडेट जाहीर केलेली नाही. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्रस्तावित आहे. या दिवशी हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
शुक्रवारी, व्हॅलिअंट कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरची किंमत ५० टक्क्यांनी वाढून बीएसईवर ९१८.६० रुपयांच्या पातळीवर पोहोचली.
गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरची किंमत ३४ टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, हा शेअर ६ महिन्यांत १६५ टक्के परतावादिला.
कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १०२१.३० रुपये आहे आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ३२२.०५ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ७००.७१ कोटी रुपये आहे.
या मल्टीबॅगरस्टॉकचे पुढील आठवड्यात एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग होईल. कंपनी पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर १.५० रुपये लाभांश देईल.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही