भारतातील सर्वाधिक कमाई करणारी रेल्वे स्थानके कोणती?
महाराष्ट्रातील कोणत्या स्थानकांचा समावेश?
भारतीय रेल्वेची देशभरात ७ हजारपेक्षा अधिक रेल्वे स्थानके आहेत. मात्र यातही २८ स्थानके अशी आहेत जी भारतीय रेल्वेसाठी एटीएम मशीन मानली जातात.
या स्थानकांतून रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. यात महाराष्ट्रातील काही स्थानकांचाही समावेश आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानक - ३३३७ कोटी
हजरत निजामुद्दीन (दिल्ली) रेल्वे स्टेशन - १२२७ कोटी
हावडा जंक्शन - १२७६ कोटी
सिकंदराबाद रेल्वे स्टेशन - १२७६ कोटी
चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशन - १२९९ कोटी
५०० कोटींपेक्षा अधिक कमाई असणार्या रेल्वे स्थानकांमध्ये मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पुणे रेल्वे स्टेशन, ठाणे, नागपूर, कल्याण या स्थानकांचा समावेश आहे.
प्रवासात बाहेरचं खाणं नकोय? मग घेऊन जा झटपट होणारे घरगुती पदार्थ