मीशोच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
ई-कॉमर्स कंपनी मीशोच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. याला ७९ पट सबस्क्रिप्शनमिळालं.
बुक-बिल्डिंग इश्यूमध्ये सुमारे ३८.२९ कोटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि ४,२५० कोटी रुपये उभारण्यासाठी १०.५५ कोटी शेअर्सचा ओएफएस यांचा समावेश होता.
८ डिसेंबर रोजी शेअर वाटप अंतिम होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर ९ डिसेंबरलाअलॉटझालेल्यांच्याडीमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. १० डिसेंबरला हे शेअर्सलिस्ट होऊ शकतात.
इश्यूचा अपर प्राईज बँड १११ रुपये असल्याने, मीशोचे शेअर्स १५७.५ रुपयांना, म्हणजेच इश्यू किमतीपेक्षा सुमारे ४२% प्रीमियमवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.
या बुक बिल्डइश्यूसाठीकेफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड अधिकृत रजिस्ट्रार होते. शेअर वाटपाची स्थिती तपासण्यासाठी रजिस्ट्रारच्यावेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर "सिलेक्ट आयपीओ" ड्रॉपडाउनमधून 'मीशोआयपीओ' निवडा. नंतर 'अर्ज क्रमांक, डिमॅट खातं किंवा पॅन' निवडा आणि तपशील भरा आणि 'सबमिट' बटण दाबा.
याशिवाय तुम्ही bseindia.com/investors/appli_check.aspx यावरुनही स्टेटस तपासू शकता. सुरुवातीला इश्यू टाईपमध्ये इक्विटी निवडून मीशो आयपीओ निवडा.
नंतर अर्जाचा क्रमांक किंवा पॅन कार्डनंबरएन्टर करा. यानंतर सर्चवरक्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट दिसेल. तसंच तुम्ही NSE वरही याची स्थिती तपासू शकता.
घर घेताना 'हा' खर्च कायम विसरून जातात लोक; नंतर होते मोठी डोकेदुखी, जाणून घ्या महत्त्वाची माहिती