पाहा कुठे आहे हा फ्लॅट आणि किती लाखांना केला त्यांनी तो खरेदी.
अंजली तेंडुलकर यांनी विरारमध्ये खरेदी केला फ्लॅट; किंमत किती, पाहा डिटेल्स
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी मुंबईजवळीलविरारमध्ये एक आलिशानअपार्टमेंट खरेदी केल्याची माहिती समोर आलीये.
कागदपत्रांनुसार, हे अपार्टमेंटविरारमधील पेनिन्सुला हाइट्स नावाच्या इमारतीत आहे. हे अपार्टमेंट ३९१ चौरस फूट जागेवर पसरलेलं आहे.
कागदपत्रांमधून मिळालेल्या माहितीनुसार हे अपार्टमेंट इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर आहे.
हा व्यवहार ३० मे २०२५ रोजी रजिस्टर करण्यात आला होता. ज्यामध्ये ₹ १.९२ लाख स्टॅम्पड्युटी आणि ₹ ३०,००० नोंदणी शुल्क समाविष्ट होते.
Zapkey.com या वेबसाइटनुसार, अंजली तेंडुलकर यांनी हे अपार्टमेंट ३२ लाख रुपयांना खरेदी केलंय. महिला खरेदीदार म्हणून त्यांना स्टॅम्पड्युटीवर १ टक्के सूट मिळाली आहे.
महाराष्ट्रात महिलांच्या नावावर घरांच्या नोंदणीवर हा फायदा दिला जातो. शहर आणि जिल्ह्यानुसारस्टॅम्पड्युटी दर ५% ते ७% दरम्यान आहेत.
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन