एका शेअरवर १० शेअर्स देणार महाराष्ट्रातील 'ही' कंपनी; नफा १४३ टक्क्यांनी वाढला

देशातील सर्वात मोठ्या शेती क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्रातील कंपनी निर्माण अ‍ॅग्री जेनेटिक्स लिमिटेड तिच्या गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. 

कंपनी प्रत्येकशेअरसाठी १० शेअर्स स्टॉक वितरित करण्याचा विचार करत आहे. ही कंपनी हायब्रीड बियाणं, कीटकनाशकं आणि बायो ऑर्गेनिक प्रोडक्टचं उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन करते.

कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट आणि हायड्रोपोनिक्स आणि अ‍ॅक्वापोनिक्समध्ये विस्तार यासारख्या प्रस्तावांवर विचार केला जाईल. 

कंपनीच्या संचालक मंडळानं १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरना एकास दहा पर्यंत अधिक सख्येत शेअर जारी करण्यावर विचार करेल.

२०२४-२५ आर्थिक वर्षात कंपनीची व्यवसाय कामगिरी चांगली होती आणि नफाही लक्षणीय होता. ऑपरेटिंग महसूल २७३% ने वाढून २३६.५१ कोटी झाला.

शिवाय, निव्वळ नफा १४३% नं वाढून २५.२८ कोटी झाला. मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल ६२.९९ कोटी होता.

बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

Click Here