सध्या देशभरात फ्रॉड आणि स्कॅमचा सुळसुळाट झालाय.
'मॅजिक माउस' हा मोठा SMS फिशिंग स्कॅम असून तो अमेरिका सहित जगभरात सक्रिय आहे.
हा स्कॅम दर महिन्याला सुमारे ६ लाख ५० हजार क्रेडिट कार्ड डिटेल्स चोरी करतो.
२०२4 मध्ये फक्त ७ महिन्यांत ८ लाख ८४ हजार कार्ड डिटेल्स चोरी केल्या गेल्याचे समोर आले आहे.
स्कॅमर नकली SMS पाठवतात, जसे की टोल टॅक्स बाकी, कुरिअर डिलिव्हरीमध्ये उशीर, किंवा सरकारी योजनांची माहिती याबाबत असतो.
या SMS मध्ये दिलेल्या फिशिंग लिंक्सवर क्लिक केल्यास पीडित व्यक्ती बनावट वेबसाइटवर आपली क्रेडिट कार्ड माहिती भरते.
चोरी झालेली माहिती मोबाइल वॉलेट्सद्वारे पेमेंट फ्रॉडसाठी वापरली जाते आणि पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवले जातात.
हा स्कॅम आधीच्या 'मॅजिक कॅट' नावाच्या ऑपरेशननंतर उभा राहिला, जे एका चीनी युवक युचेंग ने विकसित केले होते.
नवे प्रोग्रामर मिळून 'मॅजिक माउस' आणखी व्यापक आणि आक्रमक स्वरूपात चालवत आहेत.
सायबर सिक्युरिटी संशोधकांनी म्हटले आहे की हे गुन्हेगार हजारो फोन वापरून स्वयंचलित SMS मोहीमा चालवतात.
या स्कॅमपासून वाचण्यासाठी आवश्यक नसलेल्या किंवा संशयास्पद SMS कडे दुर्लक्ष करणे हेच सुरक्षिततेचे सर्वोत्तम पाऊल आहे.