या देशांच्या पोटात आहे सर्वाधिक तेल

पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश?

कोणत्याही देशाला विकासाच्या वाटेवर जायचं तर त्यासाठी खनिज तेलाला पर्याय नाही. कारण आजच्या काळात ते खूप महत्त्वाचं झालं आहे.

सध्या तरी जगात केवळ दहा असे देश आहेत, ज्यांच्या भूगर्भात सर्वाधिक म्हणजे तब्बल एक ट्रिलिअन (एक लाख कोटी) बॅरल तेल आहे.

त्यात पहिल्या क्रमांकावर आहे व्हेनेझुएला. त्यांच्याकडे सध्या तब्बल ३०३ अब्ज बॅरल तेल आहे.

दुसऱ्या क्रमांकावरील सौदी अरेबियाकडे २६७ अब्ज बॅरल, तर तिसऱ्या क्रमांकावरील इराणकडे २०९ अब्ज बॅरल तेल आहे!

ओपेक या संघटनेच्या आकडेवारीनुसार कॅनडा, इराक, संयुक्त अरब अमिरात हे देशही तेलसंपन्न आहेत!

Click Here