Labubu बनवणाऱ्या कंपनीची लागली लॉटरी, ६ महिन्यांत पडला पैशांचा पाऊस

लाबुबू बनवणारी कंपनी पॉप मार्टने या वर्षाच्या गेल्या ६ महिन्यांत मोठ्या प्रमाणात कमाई केलीये.

जगभरात लाबुबू डॉल खूप लोकप्रिय आहे. अनेक सेलिब्रिटींकडेही ही बाहुली दिसली आहे. 

या बाहुलीला इतकी मागणी आहे की ती बनवणारी चिनी कंपनी पॉप मार्टला मोठी लॉटरी लागलीये. 

२०२५ च्या पहिल्या ६ महिन्यांत कंपनीवर पैशांचा पाऊस पडलाय. कंपनीचा नफा तर वाढलाच आहेच पण महसुलातही मोठी वाढ झाली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पॉप मार्टनं म्हटलंय की या वर्षाच्या सुरुवातीच्या फक्त ६ महिन्यांत त्यांच्या कमाईत सुमारे ४००% वाढ झाली आहे. कंपनीच्या महसुलातही २०४% वाढ झाली आहे. 

लाबुबू डॉलची मागणी खूप जास्त आहे आणि कंपनी आता परदेशात अधिक उत्पादने विकत आहे, जिथे ते अधिक नफा कमवत असं कंपनीनं म्हटलंय.

पॉप मार्ट त्यांच्या collectable figurines 'ब्लाइंड बॉक्स' मध्ये विकते. याचा अर्थ असा की ग्राहकांना बॉक्स उघडल्याशिवाय त्यांना कोणतं डिझाइन मिळेल हे माहीत नसतं.

लाबुबू बनवणारी कंपनी पॉप मार्टची जगभरात दुकानं आहेत. कंपनीची आता चीनमध्ये ५७१ दुकाने आहेत. यापैकी ४० दुकाने या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत उघडण्यात आली.

FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'

Click Here