जगातील बहुतेक देशांमध्ये लोकांना करभरावा लागतो. लोकांना त्यांच्या पगारावर आणि कमाईवर हा कर भरावा लागतो.
पण असे काही देश आहेत जिथे लोकांना एकही रुपया टॅक्स द्यावा लागत नाही. या देशांमधील लोक त्यांची संपूर्ण कमाई स्वतःकडे ठेवतात. पाहूया कोणते आहेत ते देश.
संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मध्ये लोकांना कोणताही कर द्यावा लागत नाही. हा देश आपल्या तेल आणि वायूच्या कमाईमुळे खूप समृद्ध आहे. त्यामुळे येथील लोकांना कर द्यावा लागत नाही.
बहरीनमधील लोकांना त्यांच्या कमाईचा कोणताही भाग कराच्या रूपात द्यावा लागत नाही. अर्थव्यवस्था तेल, वित्त क्षेत्रावर चालते. या देशाचा महसूल प्रामुख्यानं तेल उत्पादन आणि विदेशी गुंतवणुकीतून येतो.
कुवैतमध्येही लोकांना सरकारला कोणताही कर द्यावा लागत नाही. हा देश देखील तेल संपत्तीमुळे खूप श्रीमंत आहे आणि हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे.
केमन आयलँड्समध्येही लोकांना कोणताही कर द्यावा लागत नाही. हा देश टॅक्स-फ्री व्यवसाय आणि बँकिंगसाठी प्रसिद्ध आहे. या देशाची अर्थव्यवस्था पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय फायनान्सवप आधारित आहे.
युरोपमधीलमोनाको हा देखील एक असा देश आहे जिथे लोकांना कोणताही कर द्यावा लागत नाही. या देशाची कमाई आलिशान पर्यटन आणिस्थावर मालमत्ता यातून होते.
कतार, ब्रुनेई, सौदी अरब, बहामास, आणि सेंट किट्स अँड नेव्हिस यांसारख्या देशांमध्येही लोकांना कोणताही कर द्यावा लागत नाही. यांची कमाई तेल, नैसर्गिक वायू, पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातून होते.
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा