₹३२४ वरुन₹३ वर आला 'हा' शेअर; आता कंपनी खरेदी करण्याच्या रेसमध्येअदानी
यामध्ये अदानींचं नाव जोडलं गेल्यानंतर त्यात जोरदार तेजी दिसून आली. कोणता आहे हा शेअर?
मंगळवारी व्यापारादरम्यान जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडचे शेअर्स फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअरला आज ५% चा अपर सर्किट लागलं.
यानंतर कंपनीचा शेअर ३.२९ रुपयांच्या इन्ट्राडे उच्चांकी स्तरावर पोहोचला. दिवाळखोरी प्रक्रियेतून जात असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या पाच दिवसांत ५% आणि एका महिन्यात ४% वाढ झाली आहे.
या वर्षी आतापर्यंत त्यात ४५% घट झाली आहे. त्याच वेळी, दीर्घकाळात, कंपनीचे शेअर्स ३२४ रुपयांवरून ९९% ने घसरले आहेत.
अदानीसमूहानंजयप्रकाशअसोसिएट्स लिमिटेडचं अधिग्रहणकरण्यासाठीस्पर्धा आयोगाकडून (CCI) परवानगी मागितली आहे.
अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाने कर्जबाजारी जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडसाठी (JAL) बिनशर्त बोली लावल्याचं वृत्त आहे, जी कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेतून (CIRP) जात आहे.
JAL चे मोठे रिअल इस्टेट प्रकल्प आहेत. यामध्ये ग्रेटर नोएडामधील जेपी ग्रीन्स, नोएडामधील जेपी ग्रीन्सविशटाउनचा एक भाग, जेपी इंटरनॅशनल स्पोर्ट्स सिटी, जे आगामी जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे.
(टीप - हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेटट्रिक