ITR भरतानाचूकझाली? घाबरूनका, पाहा किती वेळा करता येते दुरुस्त
ITR मध्ये चूक केली असेल तर तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही. आयकर विभाग तुम्हाला दुसरी संधी देतो.
ITR भरताना अनेकदा घाईगडबडीतअनावधानानं छोट्या चुकाहोतात. कधी उत्पन्नाचा काही भाग चुकतो, तर कधी कपातीचाकॉलम चुकतो किंवा नंबरटाईप करताना चूक होते.
चांगली बातमी अशी आहे की, जर तुम्हीही आयटीआरमध्ये चूक केली असेल तर तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही. आयकर विभाग तुम्हाला दुसरी संधी देतो, ज्याला रिवाइज्ड रिटर्न म्हणतात.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण कितीही वेळा आयटीआर सुधारित करू शकता. म्हणजे पहिल्यांदा दुरुस्त करताना चूक झाली तर ती पुन्हा सुधारण्याची संधी मिळते.
परंतु हे, असेसमेंटईयर संपण्याच्या तीन महिने आधी किंवा असेसमेंट पूर्ण होईपर्यंत, जे आधी असेल ते सुधारित रिटर्न भरावा लागेल.
जर तुम्ही तुमचा मूळ रिटर्न ऑफलाइन भरला असेल तर सुधारित रिटर्नही ऑफलाईन भरावा लागेल. प्रत्येकाला याचा फायदा घेता येतो.
कसा बदल कराल? लॉगिन करा – आयकर ई-फायलिंगपोर्टलवर जा. रिवाईज्डरिटर्न निवडा – कलम १३९(५) अंतर्गत ‘File Revised Return’ निवडा.
ओरिजनलरिटर्न तपशील भरा,पावती क्रमांक आणि तारीख एन्टर करा. दुरुस्ती करा आणिउत्पन्न, वजावट किंवा बँक तपशीलांमध्ये कोणत्याही त्रुटी असल्यास दुरुस्त करा.
व्हेरिफिकेशन करा आणिआधार ओटीपी, नेट बँकिंग किंवा इतर पर्यायांचा वापर करून रिटर्नव्हेरिफाय करा.
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज