यूको बँकेत ₹१,००,००० जमा करा आणि मिळवा₹२१,८७९ चं निश्चित व्याज
सरकारी बँक असलेल्या युकोबँकेकडून आपल्या ग्राहकांना एफडीवर आकर्षक व्याजदर दिला जात आहे. तुम्ही फक्त १ लाख रुपये जमा केल्यास त्यावर २१,८७९ रुपये इतके व्याज मिळू शकते.
एफडीचे वैशिष्ट्य हे आहे की, यामध्ये गॅरंटीसह निश्चित व्याज मिळते. युको बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर २.९० टक्के ते ७.९५ टक्केपर्यंत व्याज देत आहे.
४४४ दिवसांच्या विशेष एफडीवर सामान्य नागरिकांना ६.४५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.९५ टक्के व्याज देत आहे. तर सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक कर्मचाऱ्यांना ४४४ दिवसांच्या एफडीवर ७.९५ टक्के व्याज देत आहे.
बँक आपल्या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक कर्मचाऱ्यांना १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर १.२५ टक्के आणि १ वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर सामान्य दरापेक्षा १.५० टक्के जास्त व्याज देते.
सामान्य नागरिक असाल आणि युको बँकेच्या ३ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,२०,०९३ रुपये मिळतील, ज्यात २०,०९३ रुपयांचे निश्चित व्याज समाविष्ट आहे.
तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि यूको बँकेच्या ३ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,२१,८७९ रुपये मिळतील, ज्यात २१,८७९ रुपयांचे निश्चित व्याज आहे.
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट