होम लोनघेतलंय, आता टॉप-अपकरायचंय? पण हे खरंच फायदेशीरठरतं का?
बँका आणि फायनान्स कंपन्या आता गृहकर्जावर अतिरिक्त कर्ज देत आहेत, त्याला होम लोनटॉप-अप म्हणतात.
बँका गृहकर्जावर अतिरिक्त कर्ज देत आहेत, त्याला होम लोनटॉप-अप म्हणतात. टॉप-अप कर्जावरील व्याज बेस रेटवरआकारले जाते, म्हणून ते वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डपेक्षा खूपच स्वस्त दिसतं.
कमी व्याजदर आकर्षक वाटतो; पण यामागे लपलेले अतिरिक्त शुल्क अटी लक्षात घेणं आवश्यक आहे; अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.
टॉप-अप घेण्यापूर्वी, प्रोसेसिंग फी, प्री-पेमेंट शुल्क, वाढत्या कालावधीवर वाढणारे व्याज समजून घेणं महत्त्वाचं आहे. सर्व बँकांच्या टॉप-अप गृहकर्जाचे नियम वेगळे आहेत.
आरबीआयनं यासाठी कोणतेही पॅरामीटर्स सेट केलेले नाहीत. यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्यूटी आणि प्रक्रिया शुल्क भरावं लागेल.
बँका मूळ गृहकर्जाच्या समान दराने टॉप-अप कर्ज देतात, यात दरवर्षी ८-९% व्याज आकारले जातं. गृहकर्जाप्रमाणे, १०-१५ वर्षांचा कालावधी उपलब्ध आहे. जास्त कालावधीमुळे ईएमआय कमी दिसतो.
यातील पहिलं आव्हान फोरक्लोजर शुल्क : जर प्री-पेमेंट करण्याचा प्रयत्न केला, तर सुधारित शुल्क दर लागू होऊ शकतो. तो कधी कधी मूळ गृहकर्जापेक्षाही जास्त असतो.
दुसरं आव्हान म्हणजे किमान शिल्लक बॅलन्सची अट : टॉप-अप घेतल्यानंतर, काही बँकांमध्ये किमान ओपन बॅलन्सची अट असते.
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती