मृत सदस्याचा पीएफ आता नॉमिनीला कसा मिळणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

ईपीएओच्या सात कोटींहून अधिक सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

ईपीएओच्या सात कोटींहून अधिक सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मृत सदस्याच्या अल्पवयीन मुलांचे पीएफ, पेन्शन आणि विम्याचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील.

यासाठी पूर्वीसारखे पालकत्व प्रमाणपत्र आवश्यक राहणार नाही, अशी माहिती नव्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

 सदस्याचा मृत्यू झाल्यावर कुटुंबाला पीएफ, पेन्शन किंवा विम्याच्या पैशांवर दावा करण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागायचे. त्यांना न्यायालयाकडून पालकत्व प्रमाणपत्र मिळवावं लागायचं.

ही सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी अनेक महिन्यांच्या कालावधी लागायचा. त्यामुळे कुटुंबांना आर्थिक भार सोसावा लागायचाच, शिवाय खूप धावपळही करावी लागायची.

आता ईपीएफ क्लेमचे पैसे काढण्यासाठी सदस्याच्या प्रत्येक मुलाच्या नावाने एक वेगळे बँक खाते उघडावे लागेल. त्यानंतर, पीएफ उघडावे लागे आणि विम्याचे पैसे थेट त्याच खात्यात जमा केले जातील.

ईपीएफसाठी फॉर्म २० प्रचलित आहे. हा एक विशेष फॉर्म असून मृत ईपीएफ सदस्याच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी वापरला जातो. 

हा फॉर्म मृत सदस्याची नामनिर्देशित व्यक्त्ती, कायदेशीर वारस किंवा पालक भरू शकतात. हा फॉर्म पीएफ खात्याचा अंतिम दावा करण्यासाठी आहे.

LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

Click Here