म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकीची सुरुवात नेमकी कशी करावी?

गुंतवणूक जितक्या लवकर केली जाईल, तितकीच ती फायदेशीर देखील ठरते.

लवकर केलेली गुंतवणूक फायदेशीर देखील ठरते. पाहू नवख्या गुंतवणूकदारांनी योग्य नियोजनासह धीरानं आणि समजूतदारपणे गुंतवणूक करण्यासाठी काही उपयुक्त टिप्स.

गुंतवणुकीपूर्वी दोन गोष्टी ठरवा - जोखीम घेण्याची क्षमता, आर्थिक उद्दिष्टे.

दीर्घकालीन दृष्टिकोन : ५० टक्के गुंतवणूक लार्ज कॅप इंडेक्स फंड्समध्ये, २०-३० टक्के गुंतवणूक हायब्रीड व मल्टी-ॲसेट फंड्समध्ये आणि १० टक्के गुंतवणूक सोन्यात करा.

सोन्यात गुंतवणुकीचं महत्त्व : बाजार खाली गेल्यावर सोन्याची किंमत वाढते, पोर्टफोलिओला संरक्षण मिळतं. सुरुवातीला लार्ज कॅप फंड्स निवडा.

जोखीम क्षमता किती? उदा. तुमचे वय ३५ असेल तर १०० - ३५ = ६५; म्हणजे ६५ टक्के रक्कम इक्विटी फंड्समध्ये आणि उरलेली ३५ टक्के रक्कम डेट फंड्स किंवा कंझर्वेटिव्ह फंड्समध्ये गुंतवू शकता. 

महत्त्वाचं : घाबरून निर्णय घेऊ नका, सुरुवातीला संतुलित पोर्टफोलिओ ठेवा, संयम बाळगल्यास दीर्घकाळात संपत्ती निर्मिती शक्य आहे.

(टीप- कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड

Click Here