वारसाहक्कानं मिळालेल्या सोन्यावरील कर कसा वाचवाल? जाणून घ्या

वारसा हक्काने मिळालेल्या सोन्यावरील करनियमांबाबत अनेकांना संभ्रम असतो. 

वारसा हक्काने मिळालेल्या सोन्यावरील करनियमांबाबत अनेकांना संभ्रम असतो. कर तज्ज्ञांच्या मते, वारशानं मिळालेलं सोनं हे करपात्र उत्पन्न मानलं जात नाही. 

त्यामुळे अशा वेळी तुमच्यावर तत्काळ करदायित्व येत नाही. मात्र, हे सोनं विकलं तर भांडवली लाभ कर (कॅपिटल गेन्स टॅक्स) लागू होतो.

वारसा हक्काने मिळालेल्या सोन्यावर कर फक्त तेव्हाच लागू होतो, जेव्हा तुम्ही हे सोनं विकता. 

२४ महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवून विकलेल्या सोन्यावर दीर्घकालीन भांडवली लाभ (एलटीसीजी) लागू होतो. वर्ष २०२४ पासून त्यावर १२.५ टक्के कर आकारला जातो.

कलम ५४एफ अंतर्गत सोन्याची विक्री करून मिळालेली रक्कम ठरावीक वेळेत निवासी घर खरेदी किंवा बांधकामासाठी गुंतविल्यास करसूट मिळू शकते.

सोन्याचं मृत्युपत्र, उत्तराधिकार प्रमाणपत्र अथवा मूळ खरेदी कागदपत्रे जतन करणे अत्यावश्यक आहे. 

अन्यथा कर विभाग स्वतःचं बाजारमूल्य ठरवू शकतो, ज्यामुळे कर भार वाढू शकतो. म्हणून वारसा हक्काचं सोनं विकताना योग्य नियोजन आवश्यक आहे.

पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित

Click Here