योग्य जीवन विमा कंपनी कशी निवडावी?

विमा घेताना अनेकजण फक्त प्रीमियम किती आहे, तो आपल्या खिशाला परवडतो आहे का? याकडे पाहतात.

स्वस्त विमापाहता विश्वासार्ह विमा कंपनी निवडणे अधिक महत्त्वाचे ठरते. हे घेताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं, तसंच कोणत्या गोष्टी टाळाव्यात, यावर एक नजर टाकू या. 

सर्वप्रथम विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो तपासावा. म्हणजे कंपनीकडे आलेल्या दाव्यांपैकी किती दावे वेळेत निकाली निघाले, याचे हे प्रमाण पाहावे. हा आकडा सातत्याने चांगला असणे महत्त्वाचे आहे.

जीवन विमा दीर्घकालीन असल्याने कंपनीची आर्थिक क्षमताही महत्त्वाची ठरते. मजबूत आर्थिक स्थिती असलेली कंपनी भविष्यातही दावा देऊ शकते. चांगल्या सॉल्व्हन्सी रेशोची कंपनी चढउतारांना तोंड देऊ शकते.

गुंतागुंतीच्या योजना सुरुवातीला आकर्षक वाटतात; पण दावा करताना कुटुंबाला अडचणीत टाकतात. टर्म इन्शुरन्ससारख्या सोप्या योजना समजायला सोप्या असतात. त्याचा फायदा घ्या.

स्वस्त प्रीमियमपेक्षा मूल्य मिळते का, हे पाहणे गरजेचे आहे. चांगली सेवा, सुलभप्रक्रिया आणि मदतीचा हात असलेली कंपनी थोडी महाग असली तरी उपयोगाची ठरते. अन्यथा आपल्यामागे विमा नाकारला जाण्याची भीती असते

ग्राहकसेवा, मार्गदर्शन आणि सहकार्य देणारी कंपनी फार महत्त्वाची ठरते. शेवटी, जीवन विमा म्हणजे स्वस्त सौदा नव्हे, तर दीर्घकाळाची मानसिक शांतता आहे हे लक्षात घ्या.

मूळ विम्यासोबत गरजेनुसार अतिरिक्त 'अॅड-ऑन्स' किंवा राईडर्सची निवड करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमची सर्व माहिती अर्जात पूर्णपणे सत्य व अचूक भरा.

Click Here